आपले Gmail अकाउंट कसे सुरक्षित करावे - How To Secure Gmail Account


Gmail म्हणजेच गूगल मेल. Gmail हा आपल्या जिवनातील अविभाज्य घटक बनला आहे.

कारण त्या Gmail वर बैंक स्टेटमेंट पासून आपल्या ऑफिसियल लेटर्स, पासवर्ड रिसेट requests किंवा आपण कोठेही जर कोणत्या aap चे नवीन एकाउंट काढत असाल तर तिथे आपल्याला Gmail एकाउंट ची गरज पड़ते.

आपले है एकाउंट आपली सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन सेव करुण घेते. जर कुणी ते पहिले तर आपली सांगली पर्सनल इनफार्मेशन त्या यूजर ला कळू शकते.

त्यामुळे कुणी आपले Gmail एकाउंट ची माहिती काढून घेऊ नये ह्या साठी आपण आपले Gmail एकाउंट आपण कसे सुरक्षित करु शकतो हा मोठा प्रश्न आजच्या यूज़र्स ना त्यांचा Gmail वापरताना पडतो. 

तर आपण ह्या ब्लॉग मधे हे जाणुण घेणार आहोत की आपण कैसे आपले हे एकाउंट सुरीक्षित करु शकता.

 2 स्टेप वेरिफिकेशन चालू करावे ( 2FA )

आपले Gmail अकाउंट कसे सुरक्षित करावे - How To Secure Gmail Account


2 स्टेप वेरिफिकेशन म्हणजेच 2 फैक्टर ऑथेंटिकेशन. जर कुणाला तुमचे एकाउंट वापरायचे असेल तर फक्त पासवर्ड ची गरज असते.

जर पासवर्ड मिळाला तर त्याला तुमचे पूर्ण  Gmail, Youtube, Google Pay एकाउंटची माहिती मिळू शकते.

2 स्टेप वेरिफिकेशन चालु केल्याने कुणालापण तुमच्या एकाउंटचा पासवर्ड आणि एक रेंडमली जनरेटेड 6 डिजिट कोड असतो तो एंटर करावा लागतो त्या शिवाय तुमचे Gmail एकाउंट लॉगिन होऊ शकत नाही.

2 स्टेप वेरिफिकेशन चालू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या Gmail एकाउंटच्या  डैशबोर्डवर जावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला सिक्योरिटी सेक्शन दिसेल. सिक्योरिटी सेक्शनवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करावे. तिथे तुम्हाला 2 Step Verification चे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या Google Account चा पासवर्ड मगितला जाईल.

तिथे पासवर्ड टाकल्यानंतर तिथुन तुम्ही 2FA ( 2 Factor Authentication ) चालू करु शकता. 

Strong Password यूज़ करावा

आपण आपले Gmail एकाउंट काढताना पासवर्ड ठेवता. तो तुम्ही सिंपल असावा असे ठेवता पण जेवढा सिंपल पासवर्ड असेल तेवढ्या लवकर तो क्रैक होऊ शकतो.

त्यामुळे तुम्हाला असा पासवर्ड ठेवायचा आहे त्यात कैपिटल लेटर्स, सिम्बल्स आणि आंकांचा समावेश असावा.जरी तुमचे 1 पेक्षा जास्त एकाउंट्स असतील तर सगल्यासाठी एकच पासवर्ड ठेऊ नये.

प्रत्येक Gmail साठी रेंडमली जनरेटेड पासवर्ड ठेवावा. आणि हे सगळी पासवर्ड्स तुम्ही पासवर्ड मैनेजर ह्या एप्लीकेशन ने सुरळीतपने मैनेज करु शकता.

आपल्या बैकअप मेथड्स आणि अकाउंट इनफार्मेशन अपडेटेड ठेवावी

जेंव्हा तुम्ही तुमचा Gmail Account ओपन केला होता, तेंव्हा तुम्ही तुमची सगळी इनफार्मेशन बरोबर भरली आहे का ते डबल चेक करुण घ्यावे.

जर तिथे तुमचा कोणताही जूना मोबाइल नंबर व रिकवरी जीमेल चुकीचा असेल तर तो लवकरात लवकर अपडेट करुण घ्यावा.

त्यानंतर तुमचे रीकवरी ऑप्शन्स म्हणजेच रिकव्हरी फोन, रिकवरी ईमेल आणि सेक्युरिटी क्वेश्चन करंट इन्फॉर्मेशन सोबत अपडेट करून घ्यावे.

अकाउंट ऍक्टिव्हिटी चेक करत राहावी

आपले Gmail अकाउंट कसे सुरक्षित करावे - How To Secure Gmail Account


जर कोणी तुमच्या नकळतपणे तुमचे अकाउंट जर हाताळत असेल तर तुम्ही हे जाणून घेऊ शकता. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे जीमेल अकाउंट पहिले लॉग इन करावे लागेल.

त्यानंतर तुम्ही जेव्हा डॅशबोर्डवर याल तुम्हाला सगळ्यात खाली स्क्रोल करायचे आहे, त्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लास्ट अकाउंट ऍक्टिव्हिटी.

त्यानंतर तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या मोबाईलवर कोण कुठे लॉग-इन केले आहे, कोणत्या डेस्कटॉप वर कोण कुठे लॉग-इन केले आहे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल.

जर तुम्हाला असे वाटले की कोणी संशयास्पद तुमचे अकाउंट लॉगिन केले आहे तर तुम्ही ते अकाउंट लॉग आऊट करु शकता तुम्हाला त्यासाठी एक खाली एक ऑप्शन दिसेल साइन आउट ऑफ ऑल ई-मेल वेब सेशन्स.

अशाप्रकारे तुम्ही तुमचे सर्व जीमेल अकाउंट सुरक्षित केलेले आहेत. आता कोणीही तुमच्या सहमतीशिवाय ते अकाऊंट वापरू शकत नाही.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने